एकांत मनातला
एकांत मनातला
नको होता एकांत मनाला
सहवास एकटेपणाचा
म्हणुनी धरला होता मी
अट्टाहास तुझ्या प्रेमाचा
रोज सकाळी उठुन मी
चेहरा तुझा बघायचो
नजरेला नजर भिडताच
मनातल्या मनात हसायचो
पुन्हा कुठे दिसशील तू
याची विचारात झुरायचो
दिसली नाहीस कोण्या दिनी
तर वेडा भावळा व्हायचो
तुझ्या एका झलकसाठी
गल्लीच्या चकरा मारायचो
गल्लीतूनही तू न दिसता
मी शक्कल अशी लढवायचो
कपडे सुकवायला येशील तू
म्हणून छतावर वाट पाहायचो
दिसता छतावर येताच तू
मी आडोसा घेवुन लपायचो
वाटे तुला पाहातच राहावे
तुझ्यातच विलीन होवुन जावे
पण तुला कधी कळलाच नाही
भाव माझ्या मनातला
रात्रं-दिन ताटकळत ठेवणाऱ्या
स्वप्न कल्पनेतील साखरझोपेतला
वाटायचं तू सोबत असावी
कल्पनेचे जग सरावे
तुझ्या मिठीच्या आलिंगनात
उभे आयुष्य संपवावे
किती दिवस अगं किती दिवस
सखे आठवणीत तुझ्या जगावे
तुझी वाट पाहणाऱ्या हृदयाला
आता कसे सावरावे
