STORYMIRROR

PRAMILA SARANKAR

Romance Inspirational Others

3  

PRAMILA SARANKAR

Romance Inspirational Others

रंग पिवळा आनंदाचा

रंग पिवळा आनंदाचा

1 min
322

रंग पिवळा आनंदाचा, 

रंग पिवळा ऊर्जेचा, 

रंग पिवळा जिज्ञासूवृत्तीचा, 

रंग पिवळा सुखाचा....


आनंदाचा रंग लेवूनी

रंगला सुवर्ण सोहळा, 

पिवळ्या रंगाने बहरुन आला

आपल्या मैत्रीचा नजारा आगळा....


हळद पिवळ्या रंगाने

रंग तुझा खुलला, 

सोन पिवळ्या किरणांनी

आसमंत हा सजला.....


सोन पिवळ्या रंगाचं

तेज चेहऱ्यावर तुझ्या झळकतयं, 

त्यावर तुझं हास्य  

माझ्या मनात घर करतयं....


प्रसन्न पिवळ्या रंगात, 

लखलखतेय सोनेरी कांती, 

अबोल तुझे नयन तरी 

झगमगली आहे सारी सृष्टी.... 


वसंतातल्या हिरवाईवर जणू

सोनचाफ्याचे फूल फुलले, 

सोनेरी रुप तुझे पाहून  

आज माझे ही मन भुलले....


सर्जनशीलतेचा साज लेवूनी 

आनंदली सारी सृष्टी, 

नव आशेच्या सोन किरणांनी 

पवित्रता सर्वत्र परसली..... 


रंगात तुझ्या या

माझेही अंतरंग पावन व्हावे, 

तुझ्या परिसस्पर्शाने 

माझे मी पण गळून जावे.... 

तुझ्या परिसस्पर्शाने 

माझे मी पण गळून जावे..... 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance