मैत्री तुझी माझी....
मैत्री तुझी माझी....
तुझी माझी मैत्री
ऋणानुबंधनात हळुवार गुंफलेली
स्वच्छंदपणे बागडणारी
अन् फुलासारखी फुलणारी.....
शब्द माझे आणि स्वर तुझे
गुणगुणावे तू संगीत माझ्या श्वासाचे
आस मनी हा ध्यास मनी
पूर्ण व्हावे स्वप्न या वेड्या ह्दयाचे....
कळेना मज काय
जादू तुझ्या आवाजात
का पुन्हा पुन्हा मी
हरवते तुझ्यात.....
जगते तुझ्यात, विसावते तुझ्यात
रंगते तुझ्यात, दंगते तुझ्यात
तुझ्यात हरवूनी
मी सामावते तुझ्यात.....
कशी सावरु मी
माझ्या भावनांना
क्षणा क्षणाला शोधते मी
तुझ्याच पाऊल खुणांना...
आठवात तुझ्या
मन हे हरवते
परिसस्पर्शाने तुझ्या
माझी कळी हळूच खुलते....
परिसस्पर्शाने तुझ्या माझी कळी हळूच खुलते.....
