रंग हिरवा निसर्गाचा
रंग हिरवा निसर्गाचा
रंग हिरवा निसर्गाच्या विविध पैलूचा....
रंग हिरवा शक्ति आणि
समृद्धीचा....
रंग हिरवा चैतन्य आणि सुखाचा....
रंग हिरवा सौभाग्याच्या संपन्नतेचा....
रंग हिरवा नवरीच्या चुड्याचा....
रंग हिरवा निसर्गाच्या आवडीचा....
रंग हिरवा फुलात लपलेल्या पानांचा....
हिरवा शालू नेसून
सृष्टी ही सजली....
हिरव्या हिरव्या रंगाने
फुलराणी ही फुलली....
हिरवं हिरवं कसं सारं
रुप फुलराणीचं खुललं...
हिरव्या रंगाने
सुख माझ्या अंगणी बहरुन आलं.....
हिरवा रंग लेवून सजला
निसर्ग हा सारा
धरणीवरती अवतरली
जणू भास होई अप्सरा....
हिरवा शालू नेसलीस तू
नव्या रुप रंगाने
फुलला आसमंत सारा
कोवळ्या हिरव्या पानाने....
सौभाग्याचं लेणं लेऊनी
भरलास तू चुडा हिरवा....
सुखमय समृद्धीचा
आनंद पसरला आसमंतात नवा....
मखमली हिरवा गालीचा
शोभून दिसे माझ्या अंगणी....
हिरव्या साडीतली तू सुंदर नार शोभून दिसतेस सौभाग्यकांक्षिणी....
हिरव्या साडीतली तू सुंदर नार शोभून दिसतेस सौभाग्यकांक्षिणी....
