रंग गुलाबी शुध्दतेचा
रंग गुलाबी शुध्दतेचा
रंग गुलाबी आशेचा,
रंग गुलाबी नव्या सुरुवातीचा...
रंग गुलाबी स्नेहाचा,
रंग गुलाबी प्रेमाचा...
रंग गुलाबी जिव्हाळ्याचा,
रंग गुलाबी शुध्दतेचा...
रंग गुलाबी आपुलकीचा,
रंग गुलाबी तुझ्या माझ्यातील ऋणानुबंधाचा....
आज उगवली गुलाबी रंगाची
प्रेमाची पहाट,
गुलाबी रंगात अधिकच खुलतो
तुझ्या सौंदर्याचा थाट....
अंतरंगातील गुलाबी रंग
दिसतो तुझ्या नयनात,
आपुलकीचा भाव जाणवतो
नेहमीच तुझ्या स्पर्शात....
रंगूनी गुलाबी रंगात
हरवून जावे तुझ्या प्रेमात,
ऋणानुबंध मायेचे हे
जपून ठेवावेत नेहमीच हृदयात....
सोबतीत तुझ्या आयुष्य गवसते
नवे काही करण्याची दिशा सापडते,
मौनात तू असतेस तरी
डोळ्यातूनच तुझ्या
गुलाबी रंगाची छटा पसरते...
गुलाबी रंगाची शुध्दता
तुझ्या मुखकमलावर सजली,
प्रेमाच्या गुलाबी रंगात
सारी सृष्टी ही नटली....
नऊ दिवसांचा हा सोहळा
तुझ्याशिवाय आहे अपूर्ण
तुझ्या स्त्रीत्वाच्या महिमेला
तुझ्या गुणांनी येते पूर्णत्व....
तुझ्या संगतीत,तुझ्या सोबतीत
नेहमीच मला राहू देत
तुझ्या सहवासाने
जीवनी माझ्या रोजच नव रंगांची उधळण होऊ देत...
जीवनी माझ्या रोजच नव रंगांची उधळण होऊ देत...
