महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा
अभिमान माझा, स्वाभिमान माझा....
पराक्रमाची ही भूमी
शूरवीरांची नच इथे कमी....
तुकारामांची गाथा सांगतो
ज्ञानेश्वरीचे कवने वाचतो....
टाळ, मृदंग साक्षीला
भजनात नित्य दंगलेला
महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा.....
स्वप्ने ऊरी बांधूनी
धुळ चारुनी शत्रूला
स्वराज्याचे तोरण बांधले
नवरत्नांची खाण असा
महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा....
घामाच्या धारेतून येथे
पिकती पिवळे सोने
काळ्या मातीच्या संगतीने
उभा माझा शेतकरी येथे
जय जवान, जय किसान सांगाणारा
महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा....
जिजाऊ, रमाईची थोरवी इथे
सावित्रीची किमया इथे
सिंधुताईची जिद्द इथे
प्रगतीची क्षितिजे केली जिने काबीज
अशा समस्त स्त्री वर्गाचा
महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा....
मराठी ही महाराष्ट्राचा ताज
मराठमोळ्या संस्कृतीचा मान
मराठी मायभूमी मानती सारे
मराठीचेच इथे वाहतात वारे.....
भगव्याच्या साक्षीने उगवती
इथे अनोखे तारे....
साहित्य, कला, क्रीडा, तंत्रज्ञानाची कास धरुनी
प्रगतीची शिखरे चढणारा
नव्या नवलाईच्या गोष्टी शिकणारा
महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा....
