रंग राखाडी-वाईटाच्या नाशाचा...
रंग राखाडी-वाईटाच्या नाशाचा...
रंग राखाडी, (करडा)
कौशल्याचा आणि स्थिरतेचा
रंग राखाडी, सुरक्षेचा आणि शिस्तबद्धतेचा...
रंग राखाडी वाईटाच्या नाशाचा....
बनूनी तू दुर्गा
करतेस वाईटाचा नाश
घडवून अद्दल चांगली
सगळेच तोडतेस त्यांचे पाश....
ज्ञान आणि शक्तिची
तू आज प्रतिक जाहली
रंगाविना खुलणारी छटा
आज तुझ्या साधेपणात पाहिली....
साध्या सोज्वळ रुपातही
खुलतं तुझं सौंदर्य
राखाडी(करड्या) रंगातही खुलून दिसतं तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य...
निरागस, शामल तुझं रुप
सागराशीही होतं एकरुप
राखाडी(करड्या) रंगातही वाटतयं जणू
चांदण्यांची झाली आहे लयलूट....
तुला पाहताच नयनास मिळतो सुखद गारवा
शोभून दिसतेस तू
आजचा रंग आहे राखाडी, करडा, पारवा......
