कुणीतरी हवं....
कुणीतरी हवं....
कुणीतरी हवं मनातलं न सांगताही ऐकणारं,
न बोलताही डोळ्यातलं वाचणारं....
आपुलकीने विचारपूस करुन
मायेचा परिसस्पर्श देणारं,
घाबरु नकोस मी आहे तुझ्यासोबत
असं हातात हात घेऊन सांगणारं....
फुलपाखरासारखं स्वच्छंदी बागडणारं,
आनंदाने सुख दुःखात नेहमीच सोबत करणारं....
स्वप्नं जगायला,जपायला शिकवणारंं,
निरपेक्ष प्रेमाचा नवा अर्थ सांगणारं,
माझ्या जाणीवांना आपलसं मानणारं,
माझ्यावर माझ्यापेक्षाही जास्त प्रेम करणारं....
कोणीतरी हवं आयुष्यात
दुःखालाही सुखाची झालर देणारं,
सकारात्मकतेच्या वलयासोबत
सोबतीने पुढे पुढे जाऊया असं सांगणारं.....
सकारात्मकतेच्या वलयासोबत
सोबतीने पुढे पुढे जाऊया असं सांगणारं....

