रंग भगवा तेजाचा
रंग भगवा तेजाचा
रंग हा ऊर्जेचा, रंग हा शक्तीचा....
रंग हा धैर्याचा, रंग हा शुध्दतेचा....
रंग हा आरोग्याचा, रंग हा साहसाचा....
रंग हा तेज आणि ज्ञानाचा....
रंग केशरी,भगवा
धैर्याने नटला,
नयनातील तुझ्या शुध्दतेने
मनामनात खुलला....
तेजोमय सूर्याची लाली
मुखकमलावर तुझ्या सदा विलसते
रंग हा शुद्धतेचा रोज तू
सगळ्यांना वाटत असे...
निर्मळ, निरागस तुझ्या डोळ्यांतील तेजाने
जीवन सारे झगमगू लागते,
अंधारलेल्या वाटेवरती मार्ग सापडूनी आयुष्य सारे उजळून येते....
आज केशरी रंग परिधान करुन
आनंद तू वाटत आहेस,
धैर्याने जगण्याचा मार्ग
तू सगळ्यांना दाखवत आहेस....
सोज्वळ तुझं रुप जरी
अंगी साहसाचा महिमा,
केशरी रंग अधिकच खुलवतो
तुझ्या शुध्दतेची लालिमा....
तुझ्या शुध्दतेची लालिमा....
