रंग पांढरा शुध्दतेचा
रंग पांढरा शुध्दतेचा
रंग पांढरा शुध्दता आणि मानसिक शांतीचा
रंग पांढरा सुख आणि समृद्धीचा....
रंग पांढरा निर्मळ मनाचा
स्वच्छ सुंदर विचारांचा
हळव्या प्रेमळ भावनांचा
निर्भेळ पवित्र मैत्रीचा....
हिरव्या रंगात बहरुन
आला सृष्टीचा नजारा
श्वेत रंगात खुलून दिसतो
तुझा चेहरा हसरा....
शुध्द, शितल शांतता हास्य
तुझ्या मुखकमलावर सजते
तुला असे पाहून
आमचीही कळी खुलते...
नुसत्या तुझ्या हास्याने फुलतो
अंगणी प्राजक्ताचा ताज
श्वेत रंगांमध्ये खुलून दिसतो तुझ्या पावित्र्याचा साज...
पाहते मी तुला
जेव्हा जेव्हा फुलताना
आसमंतही धुंद होतो
तुझे गीत ऐकताना...
वाटे अंगणी माझ्या
फुलराणी ही बहरली
फुलराणी सोबत शब्दगंधात
न्हाऊन मी निघाली
फुलराणी सोबत
शब्दगंधात न्हाऊन मी निघाली....

