STORYMIRROR

Vasudha Naik

Romance

3  

Vasudha Naik

Romance

गारवा

गारवा

1 min
222

रिमझिम पावसात

मी बाहेर पडले

थेंबोथेंबी जलधारात 

चिंब चिंब भिजले...


साजनाने मला

लांबूनच पाहिले

मन त्याच्या प्रीतीच्या

झुल्यावर झुलले....


दिसताच ओलेती समोरी

साजनाच्या की आली

प्रेमाला हो त्याच्या उभारी

लाज आली माझ्या गाली....


साजनाने घेतली मला

तशीच ओलेती कुशीत

मग मी पण आले 

प्रीतीच्या छान खुशीत.....


वर्षाव केला साजणाने

प्रीतीचा आणि प्रेमाचा

दोघांनी मग घेतला 

मोद क्षणिक सुखाचा.....


मस्त पावसाळी गारव्यात

दोघांनी सुखाचे घोट घेतले

आनंदाने निपचित पडलो

सारेच अवचित असे घडले...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance