STORYMIRROR

Sneha Bawankar

Romance

3  

Sneha Bawankar

Romance

तिच्या शब्दांनी पडलाय विचारमला

तिच्या शब्दांनी पडलाय विचारमला

1 min
207

आज एक मैत्रीण म्हणते मला,

आठवण नाही येत काय त्याची तुला?

मी हसून म्हटले तिला,

काय माझ्या लेखणीत नाही दिसत तो तुला!


ती म्हणते,' प्रश्न पडतोय मला ,

तू तुझ्या प्रेमाला कसां मांडीला?

मी म्हटले, ' विचारांना विराम दे आणि ऐक जरा मला,

आशांची मी राणी आणि तो माझ्या विचारांचा राजा......


ती म्हणते, ' तुझे शब्द एकूण दुखियारण वाटते तू मला.' 

मी म्हटले,' काय ग पोरी, असे विचार वाटतेय माझे तुला.'

हसून म्हणते ती मला,' काय खोटे वाटते कधी तुझे शब्द मला,

खरं बोलतीया मी ,रुसलेल्यांचे हे शब्द वाटते मला.


हळूच म्हणते ती, ' चालली मी जेवायला.'

एवढे म्हणताच मी संवाद मोडीला,

आता पुन्हा विचारात पाडलाय तीनी मला, 

येत असेल काय आठवण माझी पण त्याला?


डोळे मिटवताच दिसतोय तो समोर मला,

हाताला बघताच वाटते त्यांनी हात पकडला,

वर्गाला आठवले की सोबत बसला दिसतो मला,

विचार पडला तर प्रश्न विचारतोय मी आज देवाला.

काय तो सुद्धा मनात आणत असेल मला?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance