चित्रकाव्य
चित्रकाव्य
शांत उभी तू अबोल जरी
एकटक न्याहाळत रवीला,
मागतो तुजला साथ प्रेमाची
मिळूनी दोघे फुलवू प्रीतीला.
सोनपिवळी प्रीत ही आपली
नेसली मावळत्या सुर्याचा पेहराव,
सागरतीरी घेऊनी वचन सखे
ओंजळीने करतो मी प्रेम वर्षाव

