STORYMIRROR

Sneha Bawankar

Romance Others

3  

Sneha Bawankar

Romance Others

माझे दुःख दिसत नाही कुणाला..!

माझे दुःख दिसत नाही कुणाला..!

1 min
267

म्हणतात की सर्व भेटलय मला,

मग का बर अश्रू येतात या डोळ्याला?

नेहमी शोधत असतात ती कुणाला,

तरीही हसताना वाटते मी जगाला


शिकली मी आता लोकांना ओळखायला,

पण वाटतंय मित्र विसरले माझ्या स्वभावाला,

रात्र निघाली सकाळच्या प्रवासाला,

पण झोप कधी येत नाही माझ्या या डोळ्याला


वाट बघत बसलीया मी सौंदर्यपूर्ण रात्रीला,

पण माझी सुरुवात कधी मिळत नाही मला?

वाटते की जीवन नाहीसे झाले जगायला,

तरीही प्रसन्न दिसते मी या विश्वाला


आज बघा माझे दुःख एवढे वाढले,

की हास्य सुध्दा म्हणतात मला रडायला,

पण आज रडता सुध्दा येत नाही या डोळ्याला,

वाटते की सुरुवात झाली माझ्या मरण यात्रेला


*पण माझे दुःख दिसत नाही कुणाला.........!*


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance