आशेची किरण
आशेची किरण
आज माझे स्वप्न मी पुन्हा हरविले
त्या स्वप्नांना मी एका व्यक्तीमध्ये रंगविले
वाटत तर नाही की मी त्याला सार्थक बनविले
पण वाटल खरंच की मी स्वतःचे स्वरूप बघून आले
निःस्वार्थ मनाची मी,पण वाटत की खूप स्वार्थी झाली
का बरं स्वतःचे स्वप्न त्याला देऊन गेली?
विश्वास नसून सुद्धा वाटत की आशेची एक नवी किरण निघाली
कारण स्वतःचे अस्तित्व मी त्याच्यात बघून आली
आज दुखास्पद वाटते कारण चरित्र्यहीन मी झाली
वेळ होता हवा मला पण मी त्याला देऊन गेली
परत येणार म्हणताच मी माझ्या वाटेला निघाली
'तू किती खरा हे भविष्य सांगेल!' मी म्हणाली
तुझा प्रत्येक शब्द नकळत लागला या मनाला,
'किती वर्षांनी आवडली तू' असे म्हटले मला
असं म्हणताच वाटल वेड लागलं या पोराला,
म्हणतोय की अंतिम क्षणापर्यंत तूच हवी मला
तू नाही भेटली तर जीव देणार मी देवाला,
जास्त वाट नको बघू फक्त थोडा वेळ दे मला,
जे हवं ते बनून दाखवील मी तुला,
पण अंतिम क्षणापर्यंत तूच हवी मला
मी ही वेडी झाली नाही वेळ दिला त्याला,
भविष्यात काय घडणार याची भीती वाटते मला,
लग्न मंडप का नसो परत आल्यास उचलून नेणार म्हणे मला,
आता खरं यामुळे मला वाटत डाग लागला माझ्या विचाराला
तुझ्यात आणि माझ्यात खूप अंतर असूनसुद्धा
आज माझी परिस्थिती दिसली तुझ्यात मला,
आशेचा किरण आहे तू, सार्थक कर त्याला
वाट बघतेय मी तुझी भविष्याला

