STORYMIRROR

Sneha Bawankar

Romance

3  

Sneha Bawankar

Romance

आठवून काय मिळेल मला ?

आठवून काय मिळेल मला ?

1 min
266

आज आठवतात ते दिवस मला

जिथे एकमेकांत गुंतण्याचा आपण खेळ मांडला

आपण मग्न होऊन विसरायचो या जगाला

पण आज त्या निरर्थकतेला आठवून काय मिळेल मला?

निरर्थक आठवणींचे मोल आज कळतंय मला

रडण्याऐवजी काही भानच नाही मनाला

जीव आजही फक्त तुझ्यातच गुंतला

पण आज त्या निरर्थकतेला आठवून काय मिळेल मला?

तुला विसरण्याचा प्रण मी आज घेतला

कारण सर्वात जास्त त्रास आठवून मलाच झाला

चूक होती माझी आणि त्यात जीवही माझाच निघाला

पण आज त्या निरर्थकतेला आठवून काय मिळेल मला ?

स्वप्न पुढे ठेऊन पुन्हा बघते मी जगाला

तुला मागे सोडून निघाली मी माझ्या वाटेला

जिथे वाट बघून मी तुला माझ्या स्वप्नात मांडल

पण आज त्या निरर्थकतेला आठवून काय मिळेल मला ?

माझे शब्द ऐकून हसतोय तू मला

आज माझी प्रत्येक आठवण व्यंग वाटते तुला

मन समाधानी झाले कारण आठवून तू माझ्यामुळे हसला

पण आज त्या निरर्थकतेला आठवून काय मिळेल मला ?


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ

Similar marathi poem from Romance