प्रेमाची परिभाषा
प्रेमाची परिभाषा
तुझ्यासमोर प्रेमाची
परिभाषा मांडतो
चल तुला आज प्रेम काय
असतं ते सांगतो || 0 ||
प्रेमात प्रेम फक्त
घ्यायचं असतं
अमृत वाटून प्रेमीकेला
विष आपण प्यायचं असतं
प्रेमिकेला सावरून
स्वतःच आयुष्य सांडतो
चल तुला आज प्रेम काय
असतं ते सांगतो || 1 ||
जगणं फक्त प्रेमिकेसत्व
हेच एक तत्व असतं
प्रेमात सखे खरंच खुप
निष्ठावान सत्व असतं
सुखं स्वतःची देऊन
दुःख स्वतः मागतो
चल तुला आज प्रेम काय
असतं ते सांगतो || 2 ||

