STORYMIRROR

Raakesh More

Romance

3  

Raakesh More

Romance

मधुचंद्र

मधुचंद्र

1 min
211

तूझ्या मानेवर चुंबन देऊन 

मिठीत तुझ्या सरायचं आहे 

रोमँटिक हे रसपान प्रिये 

आज मला करायचं आहे || 0 ||


श्वासात श्वास मिसळून आपण 

दोघे विरघळून जाऊ या 

मधुचंद्राच्या पहिल्या रात्री 

एकमेकात गळून जाऊ या 

कमरेत तूझ्या हात टाकून 

घट्ट मिठीत धरायचं आहे 

रोमँटिक हे रसपान प्रिये 

आज मला करायचं आहे || 1 ||


उचलून घेऊन अलगद तूला 

प्रेमाचा वर्षाव करीन मी 

नाही म्हणशील तू लज्जेने 

तरीही तुला आवरीन मी 

बनून अप्सरा आकर्षित कर 

आज मला हरायचं आहे 

रोमँटिक हे रसपान प्रिये 

आज मला करायचं आहे || 2 ||


जन्मांची सहचारिणी तू माझी 

मिलन आपलं युगायुगाचं 

नको बहाणा करू असा तू 

जाऊ नको दूर असं उगाच 

कुरवाळून केसांना तुझिया 

प्रेम यात भरायचं आहे 

रोमँटिक हे रसपान प्रिये 

आज मला करायचं आहे || 3 ||


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance