अधुरी प्रेम कहाणी
अधुरी प्रेम कहाणी
स्वप्न पाहिले जे मिळुन ,
तु उभा मंडपी मुंडावळ्या बांधुन ,
लाजत येईल मी ,
स्वागतार्थ राहील फुलपाकळ्यां पसरवून,
भेटता नजर आपली ,
मी भिजेल प्रेमात लाजुन ,
देशील हात मजला तु ,
अंतरपाठ येईल मध्ये ,
दोघेही जाऊ आनंदून ,
जाग आली मला ,
तुटली स्वप्नकळा ,
अश्रु आले वाट्याला ,
जीव जडला होता तुझ्यावर,
आज तुकडे विखरले मना,
सांग जाऊ कुठे ,
न्याय मागु कुठे,
वाट का ? हरवली ,
स्वप्न का ? भंगली,
मी पुर्ती दुभंगली ,
अभंग होती प्रेमवाणी ,
अधूरी प्रेम कहाणी ...
अधूरी प्रेम कहाणी...

