STORYMIRROR

Swarupa Kulkarni

Romance

3  

Swarupa Kulkarni

Romance

चंद्र आहे साक्षीला

चंद्र आहे साक्षीला

1 min
128

धूंद सुगंधी निशा ही भरजरी

लेवूनी साज शृंगार यौवनाचा

तू उभा जवळी माझीया

चंद्र आहे साक्षिला..


मी उभी मूग्ध बावरी अबोल

संकोचूनी तुझिया समिप रे

झाले अबोल क्षण एकांतातले हे

चंद्र आहे साक्षिला...


वारा निशःब्द जाहला अधिकच

हळूवार वाढवी ओढ आपुल्यातली

तू -मी शांत तरीही प्रेम उमलते हे

चंद्र आहे साक्षिला..


वाढे गोड अनामिक हुरहूर क्षणांना

जवळ ओढिलेस बहुपाशांत मजला

मी उभी बावरून ह्रदयाशी तुझिया

चंद्र आहे साक्षिला..


जाणवे धडधड तुझिया छातिची,

मी भारावले मुग्ध केव्हडी लाजूनी

तू प्रितीत सख्या मीही तूझी चंद्रिका रे

चंद्र आहे साक्षिला..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance