STORYMIRROR

Manisha Wandhare

Romance

3  

Manisha Wandhare

Romance

भुतकाळाचा तो प्रवास

भुतकाळाचा तो प्रवास

1 min
163

उडणाऱ्या रेशमी बटा हातांने सरसावत ,

गोंधळलेल्या अवस्थेत तो बावळट वर्ग शोधत ...


पडला नजरेस जसा नजर माझी हटेच ना ,

पत्ता नाही बाउसबॉलवरही विकेट जाण्याच्या नादात ...


आले शिक्षक वर्गामध्ये वर्ग चिडीचूप बसला,

माझे मन कल्लोळ बापरे वाढतच ना ऐकवत...


समजदारीने ऐकून घ्यायचे मनाने कधीच सोडले,

ऐकणार नाही तुझं म्हणूनच मलाच दटावत ...


काळ लोटला या भुतकाळाच्या प्रवासाला,

तरीही आजही तो जसाच्या तसाच आठवत ...


हेच क्षण कदाचित मन टवटवीत करतात,

आठवुन लाल केशऱ्या आठवणीने सांज हूरहूरत ...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance