STORYMIRROR

Manisha Vispute

Romance

3  

Manisha Vispute

Romance

गुलाबी मन

गुलाबी मन

1 min
129


शुद्ध भक्तीची ओढ

सत्कर्माची जोड

सदाचार अंगी

बोले सर्वांशी गोड...


सात्विक आचरण

हळवे गुलाबी मन

ममतेचा वर्षाव

स्त्री तत्वाचे दर्शन...


प्रेम स्वरुप आई

करी स्नेहाची उधळण

मनोभावे सेवा तिची

सदा मायेची पखरण...


स्त्रीत्व दर्शवितो गुलाबी

अंतरंगातील भावनांचा

उमटली नाजूक ठसा 

घेतो ठाव स्वप्नांचा...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance