STORYMIRROR

Manisha Vispute

Inspirational

3  

Manisha Vispute

Inspirational

दिवाळी उत्सव

दिवाळी उत्सव

1 min
110

दिवाळी उत्सव मोठा

पाच दिवस साजरा करी

आनंदाचा सण दिव्यांचा

मनामनात चैतन्य भरी...


वसुबारस दिन पहिला

गोमातेला सजवती

संस्कृतीचे पालन

मनोभावे गायीस पूजती...


धनत्रयोदशी येई हर्ष पेरीत

पहाटे अभ्यंगस्नान पुण्याचे

कारटं फोडती नरकचतुर्दशीस

औक्षणात दिसे तेज चेहऱ्याचे...


दारी सुंदर, प्रकाशित कंदील

रोषणाईचा झगमगाट

रांगोळी, पणत्या सुबक

आतिषबाजीचा कडकडाट...


पाडव्यास ओवाळती पिता आणि पतीला

भाऊरायाला भाऊबीजेस

घेऊन फराळाचा आस्वाद

देती शुभेच्छा एकमेकांस...


फराळाची अवीट गोडी

उतरते नात्यात 

ज्योतीच्या ज्योतसम

स्नेह उजळतो हृदयात...


सप्तरंगी तेजाची दीपावली

पसरवी इंद्रधनू जीवनात

अंधारातून नेई प्रकाशाकडे

लावून ज्ञानदिवा आयुष्यात...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational