STORYMIRROR

Manisha Vispute

Inspirational

2  

Manisha Vispute

Inspirational

ज्ञानाचा नारंगी

ज्ञानाचा नारंगी

1 min
59

शोभतो ज्ञानाचा नारंगी

आत्मविश्वास जागवतो

अनुभव घेऊन सारा

यशस्वी होऊन दाखवतो...


भगवे शेंदूर भक्तीचे

केशरी फेटा शौर्याचा

नव्या विचारांची आग

शूर क्रांतीवीर सत्याचा...


त्यागाचे प्रतीक

तेज विश्वासात

ज्योत ज्ञानाची

प्रकाशित मुक्तछंदात...


पावित्र्याचे सारे रंग

पसरु या नात्यात

साजरा करु उत्सव

एकचि होऊन ढंगात...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational