फाल्गुन पौर्णिमा
फाल्गुन पौर्णिमा


फाल्गुन पौर्णिमा
मांगल्याचा असे क्षण,
देशभरात करती साजरा
आनंदाने होळी सण...
द्वेष,राग,मत्सर
विकृती टाकू जाळून,
प्रेमभाव पसरुया
संकल्प हा करुया...
मतभेद विसरुन
एकत्र सारे येऊया,
असत्यावर सत्याचा विजय
हिंमतीने संकटाशी लढूया...
पुरणपोळीचा गोडवा
नात्यात भरया,
रंगात रंगून
सप्तरंग उधळूया...
मानवाचे कर्तव्य
निसर्ग संवर्धन,
जाणूनी पर्यावरणाचे मोल
करु वृक्ष-वेलींचे जतन...