प्रीत
प्रीत


तुझी माझी प्रीत
आहे जगावेगळी,
प्रेमात खुलते
गालावरची खळी...१
आपल्या प्रेमकथेला
किनार विश्वासाची,
अडखळणाऱ्या पावलांना
गरज आधाराची...२
भाव डोळ्यातले
दाटले मनात,
विसरुन सारे जग
विसावले बाहूपाशात...३
स्वप्नपूर्ती संसाराची
सुखाची झाली बरसात,
गोड नात्यातून फुलले
नंदनवन अंगणात...४