STORYMIRROR

Manisha Vispute

Inspirational

3  

Manisha Vispute

Inspirational

मोरपिसी स्पर्श

मोरपिसी स्पर्श

1 min
118

मोरपंखी छटा विविध

हिरवा, निळ्या संग

एकवटले मयुरात

नाचण्यात झाले दंग...


बेधुंद नाचूनी,खेळूनी

अनुभव क्षणांचा साठवावा

अलवार मोरपिसी स्पर्श

आनंदाने कवेत घ्यावा...


पंखात भरु बळ

मुक्त विहरण्याचे

उत्कर्षाची वाट

सार्थ करी आयुष्याचे...


मोरपंखी रंग मैत्रीचा

हळूवार जपण्याचा

मिसळून एकमेकांत

मान ठेवू जाणिवांचा... 


रंगीबेरंगी जीवन साकारु

उतरवू इंद्रधनू अंगणात

विविधतेत होऊ एकरुप

समानता आणू देशात...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational