STORYMIRROR

Manisha Vispute

Inspirational

3  

Manisha Vispute

Inspirational

करु सन्मान ती...चा

करु सन्मान ती...चा

1 min
193

सुनिता विल्यम्स,कल्पना चावला,सुधामूर्ती,

कार्य यांचे महान

मुलगी,बहिण,आई,सून

यांनाही द्यावा मान...१


दुर्गा,खाली, सरस्वतीचा अंश

नका करु नारीचा मत्सर

संस्कृतीचा वारसा जपणारी

निशीदिनी करु आदर...२


प्रेयसी,सखी, सहचारिणी

हृदयाचे गोड स्पंदन

जन्मभर साथ मायेची

जखमेवर शितल चंदन...३


पेटलेली ज्वाला

अन्यायाशी लढणारी

कवीची कविता

सौंदर्य खुलवणारी...४


दिव्याची वात

घरसंसार प्रकाशित करते

नवरात्रीचे नवरंग

जीवनात भरते...५


कुटुंबाचा आधारस्तंभ

कुलस्वामिनीचा मान 

करु सन्मान ती...चा

राखून सारे भान...६


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational