STORYMIRROR

Manisha Vispute

Others

3  

Manisha Vispute

Others

व्रतवैकल्याचा मास

व्रतवैकल्याचा मास

1 min
209

सोमवारी शिवामूठ

अभिषेक पिंडीला,

झोके बांधूनी झुलती

लेकी मंगळागौरीला !१!


सुवासिनी पंचमीला 

दूध पाजती नागोबाला,

जिवतीची पूजा शुक्रवारी

चण-गूळ नेवैद्याला !२!


बालब्रह्मचारी रुप

शनिवारी मान मुंजाला,

ओवाळून भाऊरायाला

बांधती राखी रक्षाबंधनाला!३!


श्रावणी संस्कार 

असतो शरीर शुद्धीचा,

पंचगव्य,नवे जानवे 

देऊन करती ब्राह्मणाचा!४!


पुत्रदा एकादशीस

श्रीविष्णूचे ध्यान,

हयग्रीव देवतेला

दक्षिण भारतात मान!५!


सागरास करती अर्पण

पौर्णिमेला देऊन श्रीफळ,

नारळाच्या पदार्थांची रेलचेल

गोड, मधुर सर्वत्र दरवळ!६!


गोकुळ अष्टमीला

जन्म श्रीकृष्णाचा,

बालगोपाल दहीहंडी फोडून

वाटती प्रसाद कालाचा!७!


बैलपोळा साजरा

सजवूनी बैलाला,

वाण देऊनी ओवाळती

मुलाला पिठोरी अमावस्येला!८!


सण-उत्सवांचा मिलाप

व्रतवैकल्याचा मास,

चराचरात चैतन्य

दैवी शक्तीचा वास!९!


श्रावण सरींची माळ

निसर्ग हिरवागार,

भक्ती प्रेमाचा संगम

सौंदर्याचा अविष्कार!१०!


Rate this content
Log in