पाऊसधारा
पाऊसधारा
1 min
109
आभाळ आले दाटून
काळ्या-निळ्या मेघांनी
रिमझिम पाऊस धारा
मोहरली सृष्टी मृदगंधांनी...१
घेती मिठीत धरणीला
तृष्णा होई तृप्त
चिंब बीज अंकुरले
होते पोटी सुप्त...२
अवखळ चंचल सरी
कुंद वाहे हवा
पसरवी गारवा
शहारा येई नवा...३
हिरव्या मखमालीवर
वाऱ्यासंगे डोले तृण
बळीराजाच्या कष्टाचे
फेडती धरा ऋण...४
हिरवाईचा शालू
जणू नववधूचा साज
चराचरात चैतन्य
इंद्रधनूचा ताज...५
