STORYMIRROR

Manisha Vispute

Inspirational

3  

Manisha Vispute

Inspirational

मायबोली

मायबोली

1 min
144

संतांच्या वचनातून

अभंगात रंगली,

शब्दफुलांच्या दरवळीत

लावणीतून खुलली...||१||


काना, मात्रा, वेलांटीत

मायबोली सजली अलंकारात,

सरस्वतीचे देखणं रुप

दिसले भिन्न स्वरुपात...||२||


मानवाच्या जगण्याला

मिळाली हिंमत,

काय वर्णू थोरवी?

कळाली तिची किंमत...||३||


गौरव मराठी भाषेचा

जगभर मांडू प्रचार,

जयघोषात करु

साहित्याचा प्रसार...||४||


मातृभाषेचा मनी

स्वाभिमान जागवू या,

महाराष्ट्राच्या संस्कृतीचा

अभिमान बाळगू या...||५||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational