लग्नाच्या वाढदिवसाच्या प्रातःकाळीं शुभेच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या प्रातःकाळीं शुभेच्छा
नव क्षितिजावर सूर्य उगवूनी,लग्नाच्या वाढदिवसाच्या देतो शुभेच्छा ।
आरोग्य आणि ऐश्वर्य लाभो तुम्हाला हीच आहे माझी (सूर्याची) इच्छा ॥
आयुष्याच्या ''संध्याकाळाचा'' करितो मी (सूर्य) तरी का कधी विचार ।
तेजोमय करितो क्षण क्षण ना होता कधीही लाचार ॥
विविध रंगांच्या छटांनी ''संध्या-समय'' करितो साजरा ।
प्रेमाच्या रंगाने तुम्ही ही रंगवा येणारा प्रेत्येक क्षण हासरा ॥

