कविता
कविता
1 min
278
उत्तम कविता करायला सुद्धा मनाचे स्थैर्य लागते ।
थोडा मिश्कीलपणा आणि थोडं गांभीर्य लागते ॥
कवीला कविता करणं काही कठीण काम नाही ।
पण नीट यमक जुळले नाही तर कवितेत काही राम नाही ॥
कवीच्या मनात कविता हुळूच कोमल पावलांनी येते ।
चांगली कविता असली तर श्रोत्यांच्या मनावर ठसा उमटवून जाते ॥
' क वि ता ' म्हणजे कल्पकतेची आणि विचारांची जुळलेली तार ।
अशा कविता करणाऱ्या साऱ्याच 'कवींना' माझे वंदन त्रिवार ॥
