STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Romance

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Romance

नयनबाण तुझे..

नयनबाण तुझे..

1 min
295

नयनबाण तुझे जुलमी गडे

गडे तू माझा नको बळी घेऊ,

घेऊ ध्यास प्रेमाचा दोघे

दोघे प्रितीत नाहून जाऊ.


जाऊ विसरून दुःख सारे

सारे स्वप्न करु साकार,

साकार होईल जीवन आपले

आपले जगास देऊ विचार.


विचार जुळावेत दोघांचे

दोघांचे स्वप्न एक हवे,

हवे मज सहवास तुझा

तुझा नयनबाण न हवे.


हवे तुझे स्मीत राणी

राणी तुझी हवी प्रित,

प्रित येई भरास आपली

आपली होईल ग जित.


जित आपली प्रेमात

प्रेमात झालो दोघे वेडे,

वेडे तुझ्या सजनाला

सजनाला तू जान गडे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance