STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Romance

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Romance

जीव तुझ्यात रंगला

जीव तुझ्यात रंगला

1 min
266

सांगतो मी तुला सखे

जीव तुझ्यात रंगला...

या राजाची तू ग राणी

करु संसार चांगला...


प्रितीत दोघं न्हाऊ

जन्मोजन्मी साथ देऊ,

केला अर्पण जीव तुला

काय हवा गाडी, बंगला...


दिन रात मी झुरतो

नवस तुझ्यासाठी करतो,

तडफडतो माझा आत्मा

जीव तुझ्यासाठी टांगला...


राधा,सिता,रुख्मिणी,पार्वती

लैला, हिर,सावित्री, दमयंती

सर्वस्व माझं तू ग

तुच माझी मंगला...


दावू जगा आपली प्रित

पतीपत्नीचं आदर्श नातं,

होऊ अमर दोघं जगी

देऊ आदर्श जगा चांगला...


तुझ्याविना जगावं कसं

तुच जगण्याची आस ,

तुच जीवन मरण माझं

जीव तुझ्यात रंगला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance