पहिला पाऊस पहिली सर...
पहिला पाऊस पहिली सर...
पहिला पाऊस, पहिली सर,
तुझ्या आठवणींचा, येतो बहर...
ढगाळलेले आकाश, सुसाटलेला वारा,
दाटून आला, आसमंत सारा...
तुफानलेलं वादळ, बेभानलेला वारा,
छेडीत जातो, हृदयाच्या तारा...
ओलेचिंब अंग, पडलेल्या गारा,
अंगाला झोंबतो, गार -गार वारा...
उसळलेल्या लाटा, इंद्रधनूच्या छटा,
सोनेरी किरणांच्या, विस्तारलेल्या वाटा...

