तुझी न माझी अबोल प्रीत...
तुझी न माझी अबोल प्रीत...
फार बोलका मी,
खूप अबोल ती...
होतो व्याकुळ मी,
असते उदास ती...
धो धो पाऊस मी,
ढगांचा गडगडाट ती...
प्रेमाचा झरा मी,
वाहती जलधारा ती...
प्रीतीचे बंध मी...
रेशमी धागा ती,
विणण्यास आतुर मी,
गुंफण्यात चतुर ती...

