संक्रांत स्पेशल...
संक्रांत स्पेशल...
1 min
557
तिळगुळ घ्या गोड बोला...!
तिळगुळ घ्या गोड बोला...!!
फक्त एक दिवस वाजवतात डंका,
मग त्यादिवशी कोनावरच येत नाही शंका...!!
तिळगुळ दिल्यानं माणसं गोड बोलत असती,
तर माणसात कटुताच आली नसती...!!
खरतर माणसात एवढी नाही राहिली गोडी,
हल्ली माणूसच माणसावर करतो कुरघोडी...!!
आपलीच माणसं जेव्हा परक्या सारखी वागतात,
खरचं सांगा लोक तिळगुळ का वाटतात...!!
तिळगुळावर सगळाच नका देऊ भार,
माणसानं माणसालाच देऊ आधार...!!
तिळगुळ घ्या गोड बोला...!!!
