#कोरोनानं घातलाय धुमाकूळ...
#कोरोनानं घातलाय धुमाकूळ...
कोरोनानं घातलाय धुमाकूळ,
जनजीवन झालंय विस्कळीत...
जनता झाल्या भयभीत,
कधी होईल हो सुरळीत...
सर्व देशात आहे,
कोरोनाची दहशत...
कोण जगेल कोण मरेल,
नाही काही शाश्वत...
घरा बाहेर पडायची,
घेऊ नका रिस्क...
खरंच गरज आहे आत्ता,
नक्की लावा मास्क...
वाचवायचा असेल देश,
तर नक्की बसा घरात...
नाही तर हा कोरोना,
पसरेल हो देश भरात...
देशाला आपल्या एकीची,
हवी आहे साथ...
तरचं प्रत्येक जण,
कोरोनावर करेल मात...
नका पडू घरा बाहेर,
नका खेळू जीवाशी...
घरात राहून त्याला पळवू,
हे स्वप्न बाळगा उराशी...
