कविता संग्रह
कविता संग्रह
सजल्या मैफिलीत माझ्या,
एकदा कविता देखील लाजली.
जेव्हा पाहताच मला समोर,
" ती " क्षणात मधाळ हासली....
अवचितच " तीला " पाहुनी
सर्वांगास कंप सुटला.
म्हटले...
कागदावर उतरवलेला कविता संग्रह,
आज प्रत्यक्षच उभा ठाकला....
पुढे मग..
कसली मैफिल अन् कसली कविता,
मी ही क्षणभर स्तब्ध झालो.
कविता होती हातीच माझ्या,
अन् मी " तीला " वाचत राहिलो... !!!

