आयुष्या सांग मजला...
आयुष्या सांग मजला...
1 min
267
आयुष्या सांग मजला, तो काळ कोणता होता.
मी चाललो ज्या दिशेने, तो मार्ग कोणता होता.
घटकेतच दाविला, सूळ मजला तयांनी.
नेमका असा माझा, गुन्हा कोणता होता.
आयुष्या सांग मजला...!
कित्येकदा दैवाने, अपयशास घेतले कवेत.
ना आजवर कळले कधी, तो योग कोणता होता.
आयुष्या सांग मजला...!
जीत ही होती माझी, पराभवही माझाचं.
हे दुतर्फा दान देणारा, खेळ कोणता होता.
आयुष्या सांग मजला...!
अडखळलो जरी, प्रत्येक वळणावरी चालताना.
परि हलकेच सावरणारा, हात कोणता होता.
आयुष्या सांग मजला, तो काळ कोणता होता...!
