आयुष्यावर प्रेम करा... !
आयुष्यावर प्रेम करा... !
मन भरुनी जगावे,
फक्त इतकाचं नेम करा.
दु:खावरती घालुनी फुंकर,
दोस्तहो... आयुष्यावर प्रेम करा...!
चारच क्षण हे जगायचे,
मग पुन्हा न मागे बघायचे.
निसटून जाती ते क्षण सोनेरी,
मुठीत मनाच्या घट्ट धरा.
दोस्तहो... आयुष्यावर प्रेम करा...!
व्हायचे ते होऊनी गेले,
नसे नशिबी ते निघूनी गेले.
झटकूनी आता ही मरगळ सारी,
पुन्हा यशाचा मार्ग धरा.
दोस्तहो... आयुष्यावर प्रेम करा...!
दोष नसतोच मुळी इथे कुणाचा,
खेळ सारा आपल्या मनाचा.
आजवर ठेविल्या ज्या इतरांकडूनी,
त्या अपेक्षा इथे बाजूस सारा.
दोस्तहो... आयुष्यावर प्रेम करा...!
द्वेष, तिरस्कार सगळे इथेच,
गर्व, मिजास ती ही इथेच.
काय नेणार सोबती सांगा,
म्हणूनी आताच क्षणभर थांबा.
क्रोधापायी रिती झाली ओंजळ,
आता प्रेमाने पूर्ण भरा.
दोस्तहो... आयुष्यावर प्रेम करा...!
