कित्येकदा, पहावे तुला...
कित्येकदा, पहावे तुला...
कित्येकदा, पहावे तुला ऐसा ध्यास होतो.
दरवेळीच माझा, भ्रमनिरास होतो.
कुठूनशी येते एक झुळूक हलकेचं,
मला मात्र तुझ्या स्पर्शण्याचा भास होतो.
कित्येकदा, पहावे तुला ऐसा ध्यास होतो...
भरली जरी असंख्य पाने तुला लिहीताना,
त्या पानांवरला प्रत्येक शब्दान् शब्द खास होतो.
कित्येकदा, पहावे तुला ऐसा ध्यास होतो...
लोचनांसही कळते किंमत एकेका अश्रुंची,
तयांसही मनावरल्या घावांचा त्रास होतो.
कित्येकदा, पहावे तुला ऐसा ध्यास होतो...
गोविंदासही लागावा जसा छंद राधिकेचा,
तसा तुझा सहवास मजसाठी श्वास होतो.
कित्येकदा, पहावे तुला ऐसा ध्यास होतो...!

