डोळ्यांतली सर...!
डोळ्यांतली सर...!
जरा आवर घाल रे स्वतःस,
असे कुणी का बेभान बरसतो ?
तुझ्या प्रत्येक सरीसह,
तीच्या आठवणी होतात रे जाग्या.
मग नकळत नयनांतूनी माझ्याही,
तुझा एक थेंब ओघळतो.
तुझी प्रत्येक सर सुखावहच,
पण माझे तसे नाही.
एखाद्या आपल्या सरीने मन होईलही शांत,
पण होतेच असेही नाही.
मग कसा आपला मेळ बसेल ना ?
म्हणून म्हणतो जरा स्वतःला आवर घाल,
अजूनी पावसाळा कैक बाकी आहे.
तुझ्यासह माझ्या डोळ्यांतली सर देखील,
मित्रा... फक्त तुझ्याच हाती आहे... !

