Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

siddharth ambekar

Romance

4.5  

siddharth ambekar

Romance

माझ्या आवडीचा पाऊस...

माझ्या आवडीचा पाऊस...

2 mins
903


तो पाऊस ना मला खूप आवडतो.

तुला अधिकच माझ्याजवळ आणणारा.

नेमके आपण घरी परतत असताना तो हजेरी लावतो.

त्याला आलेलं पाहून तुझा चेहरा सुखावतो... आणि तुला तसं आनंदी पाहून माझाही.

मग पुन्हा तुझी अगदी लहान मुलांप्रमाणे मस्ती सुरु होते,

अन् तू डोळे वटारलेस की, माझ्या हातातली छत्री सुध्दा आपोआपच बंद होते.

तू त्या पावसाचा प्रत्येक थेंब झेलतेस, अनुभवतेस.

मी मात्र भर पावसातही तुझं ते मोहक रुप पाहूनच चिंब होतो.

तुझ्या गालावरून ओघळणारा तो प्रत्येक थेंब माझ्या ओठांना, त्यांना स्पर्शण्यास साद घालतो.

कोण जाणे काय एवढी चुंबकीय शक्ती असते त्यात ?

मी खेचला जातोच तुझ्याकडे इतक्यात ती चमकणारी विज त्यात व्यत्यय आणते,

आणि तिला पाहून तू चटकन माझा हात धरतेस.

माहित आहे मला.. तुला चमकणा-या विजेची आणि ढगांच्या गडगडाटाची भिती वाटते.

पण तुला माहितेय ? मला ते दोघेही फार आवडतात.

कारण त्यांच्यामुळेच तर तू येऊन मला बिलगतेस.

मनं एकरुपच आहेत गं आपली, पण देहातलं अंतर ते दोघं कमी करतात.

इतकं सगळं काही अनुभवत आपण घरीही पोहोचतो.

आणि माझ्यात दडलेला तो तुझा प्रियकर शेवटी तुझ्या मिठीत येऊन विरघळतो.

पण तू मात्र... 

" ए सोड बघू... आधी फ्रेश हो ! " असं म्हणतेस,

आणि मला दूर ढकलून अक्षरशः पळ काढतेस.

पण नजरेत मात्र तेच प्रेम, तीच भावना... मला सतत खुणावणारी.

काही वेळातच आवरुन बेडवर बसलेला मी, आणि बाहेर बेधुंद कोसळणारा तो पाऊस तुझीच वाट बघत असतो.

आधीच त्याने भिजवलेले केस पुसुन कोरडे केल्यानंतर आणखी सुकण्याची वाट पहात, ते तसेच मोकळे सोडून हातात कॉफीचा कप घेऊन तू समोर येऊन उभं रहाणं,

अन् मी त्या पावसातल्या आणि आता समोर असणा-या तुझ्या रुपांची तुलना करत तुझ्यात हरवून जाणं..

सारं काही अदभुतच... नाही का ?

शेवटी माझ्या नजरेतला रोख तुझ्याही लक्षात येतो,

आणि मला भानावर आणण्यासाठी मुद्दामच तो गरम कॉफीचा कप माझ्या हाताला टेकवून चटका दिला जातो.

मी भानावर येताच तो कॉफीचा कप माझ्या हातामध्ये देतेस,

आणि तू सोशल डिस्टन्स पाळत थेट खिडकीपाशी खुर्चीत बसतेस.

इकडे माझे ओठ कपाला लागतात खरे, पण नजर मात्र तुझ्यावरच.

मग... हे सगळं काही लक्षात येताच,

तू ही अगदी लाडात येतेस.. आणि

" सिध्दार्थऽऽऽ ऐकव ना रे छानसं काहीतरी.. ! "

असा हट्ट माझ्याकडे धरतेस.

तसे तुलाही माहित आहेच,

तुला नकार देणे मला कुठे जमते.

नेमकी टेबलावरची हार्मोनियम आता माझ्यासमोर येते.

एखाद दोन तुझी आवडती गाणी, मी ही मनापासून गुणगुणतो.

तसा स्वर पक्का नाहीच माझा,

तरीही केविलवाणी धडपड तुझ्या हट्टापायी करतो.

याच आपल्या तिघांच्या रंगल्या मैफिलीत...

अखेर एकदा एक मोठा श्वास घेऊन,

तुला आणखी काही ऐकवण्याचा प्रयत्न मी करता,

मलाच तेव्हा ऐकू येतात बघ...

तुझ्या नाजूक, थरथरत्या ओठांवर आलेल्या तुझ्याच सिद्धलिखितच्या कविता...

सारं काही श्रेय त्या पावसाचं बरं का.

म्हणून म्हणतो मी तुला,

असा पाऊस खूपच आवडतो मला...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance