STORYMIRROR

Pushpanjali A B

Romance

4  

Pushpanjali A B

Romance

Different की same...?

Different की same...?

1 min
14.6K



तू moon, मी star,

तू जवळ, तरी far!

तू ताल, मी गीत,

तू शब्द, मी संगीत!


तू rhythm, मी ताल,

मी कट्यार, तू ढाल!

मी वेडी, तू हुशार,

मी उष्ण, तू गार!


मी गोळ, तू तिखट,

तू सोपा, मी विकट!

मी बोलकी, तू अबोल,

मी उथळ, तू खोल!


मी अवघड, तू सहज,

मी luxury, तू गरज!

मी नभ, तू आभाळ,

मी दोरी, तू जाळ!


मी पतंग, तू छोर,

मी कोकिळा, तू मोर!

मी हसरी, तू गंभीर,

मी tension, तू धीर!


मी चंचल, तू स्थिर,

तू सागर, मी विहीर!

मी fast, तू slow,

मी twinkle, तू glow!


तू रंग, मी रूप,

मी गारवा, तू ऊब!

मी स्वप्न, तू अस्तित्त्व,

मी सावली, तू व्यक्तितत्व!


अश्या भांडणात ही प्रिती,

यात गोडवा पण किती!

असं अद्भूत हे नातं,

जन्मोजन्मी ची साथं!


रोज खुलते एक कळी नवी,

मला तुझी अशीचं जवळीक हवी!

आपण different असूनही same,

मजं भावे तुझं हे जगावेगळं प्रेम!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance