STORYMIRROR

Pushpanjali A B

Comedy Romance

5.0  

Pushpanjali A B

Comedy Romance

जगावेगळं प्रेम!

जगावेगळं प्रेम!

1 min
15K


तो moon, तू star,

तू जवळ, तो far!


तू ताल, तो गीत,

तू शब्द, तो संगीत!


तू rhythm, तो ताल,

तू कट्यार, तो ढाल!


तू वेडी, तो हुशार,

तू उष्ण, तो गार!


तू गोड, तो तिखट,

तो सोपा, तू विकट!


तू बोलकी, तो अबोल,

तू उथळ, तो खोल!


तू अवघड, तो सहज,

तू extra, तो गरज!


तू नभ, तो आभाळ,

तू दोरी, तो जाळ!


तू पतंग, तो छोर,

तू कोकिळा, तो मोर!


तू हसरी, तो गंभीर,

तू tension, तो धीर!


तू चंचल, तो स्थिर,

तो सागर, तू विहीर!


तू fast, तो slow,

तो twinkle, तू glow!


अश्या भांडणात ही प्रिती,

यात गोडवा पण किती!


असं अद्भूत हे नातं,

जन्मोजन्मी ची साथं!


ते वेगळे असूनही same,

असचं फुलुद्या हे प्रेम!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy