STORYMIRROR

Pushpanjali A B

Others

2  

Pushpanjali A B

Others

बाल संगोपन

बाल संगोपन

2 mins
13.4K



झाली लग्नाला खूप वर्ष आता हलूू द्या पाळणा,

घाई ही दुसऱ्यांना का असते तेच कळेना?


घराला घरपण आणि बाईला मातृत्व,

बाळच देतो सुखी संसाराला पूर्णत्व!


हवा असतो तो सर्वांना बाळ देखणा,

वंशाचा दिवा, वृद्धत्वाचा तो कणा!


छोटा असताना जो असतो प्राण की जीव,

मग का पुढे त्याचा सांंभाळ होतो अप्रिय!


मग का लगेच होऊ लागतो त्रास,

होऊ लागतो कंटाळा, वाटे भार!


त्याचे बोबडे बोल आणि मधुर वाणी,

ठरते डोकेदुखी आणि कंटाळवाणी!


पावले ती रूणझुणती धावती दुडू दुडू,

दमले रे मी आता मागे किती पळू!


चिऊ काऊ चे इवले इवले घास,

पटकन संपव आता कौतुक झाले बास!


आम्ही केले खूप आता ही तुमची जबाबदारी,

आता नाही होत आमच्याने ही ड्यूटी भारी!


त्यांची काय चुकी त्यांचा नसतो दोष,

घरात का मग हा करता आक्रोष?


त्याचे हे सुंदर गोजिरे बालपण,

यात हरवूया आपले दुःख आपण!


मलापण त्याला सोडून जायला आवडतं नाही!

विसरुन जाता तुम्ही मी आहे जन्मदात्री आई!!


करियरची ही धावपळ पैशाचा बाजार,

सॉरी रे माझ्या बाळ, आहे मी लाचार!


कधी कधी होते मी त्रस्त एवढी,

वाटतं सोडून द्यावी ही कामं सगळी!


आणि घ्यावं तुला कुशीत देऊन घट्ट मिठी,

सांगावं ह्या जगाला माझं प्रेम तुझ्यावर किती!


पण होती मला हे जग जिकण्याची घाई,

त्यात हरवले मी तुझ्या बालपणाचे क्षण काही!


कळतं मला माझ्या बाळाचे तुम्हास ओझे फार,

तो पण आहे तुमच्या भावी आयुष्याचा आधार!


ज्याने लावले वृक्ष त्याला मिळत नसती फळे,

निःस्वार्थ सेवा हा धर्म फक्त माणसा कळे!


सगळे मिळून राहू प्रेमाने जसे फूल माळ,

बाळालापण कळू द्या आजी आजोबांचे लाळ!


का पाळणाघर, का दुसऱ्यांचा पर्याय?

आपणच करू एकमेकाला सहकार्य!


बाळात दिसेल आपल्याला आपलं प्रतिबिंब,

तेव्हाच होणार आपलं खरं संपूर्ण हे कुटुंब!


Rate this content
Log in