STORYMIRROR

Pushpanjali A B

Romance

5.0  

Pushpanjali A B

Romance

Happy birthday dear hubby!

Happy birthday dear hubby!

1 min
3.6K



आई वडिल भावांचे लाळके, बालपणापासून अतिशय हुशार;

आपल्या क्षेत्रात निपुण, तरबेज़ सर्जन, म्हणून त्यांची ख्याती अपार;

सर्वांची घेतात खूप काळजी, कुटुंबाचा ते स्तंभ व आधार;

फिटनेस फ्रीक डॉक्टर, बघता त्यांना पळतो लांब आजार;

मृदु आणि गोड त्यांची वाणी, नाही कसलाही अहंकार;

मत्सय, द्वेष ना ठाऊक त्यांना, साधी राहणी स्वच्छ विचार;

छल कपट कधीच मनात नसते नाही व्यसन वा व्यभिचार;

मदत करायला सतत पुढे, नवरा माझा आहे दिलदार;

शिस्तबद्द पण हळवे, अद्वय वर प्रेम करतात जीवापार;

बायकोचं आहे कौतुक प्रत्येक पावलावर साथ आणि होकार;

शौपिंग असो वा डायमंड्स, कुठल्याही गोष्टीला नसतो नकार;

कच्च पक्क सर्व निमूटपणे, वरुन 'रानी बेत सुन्दर झालाय गं फार!'

मम्मा म्हणजे झाले का हो मी म्हातारी, ह्यावर त्याचं उत्तर आहे तैयार;

तू अजूनही दिसते 16 ची, तुझ्या नज़रेंने झालो ठार!

चिकन आवडीचा पदार्थ, नंतर आइसक्रीम हवं थंडगार;

देश विदेश भ्रमणाची भारी हौस, फिरायला रेडी नेहमी बाइक असो वा कार;

सत्याचे ते अनुयायी, अंधश्रद्धा आणि अज्ञानाचा करतात बहिष्कार;

उदंड आयुष्य लाभो तुम्हास, Happy Birthday अविष्कार!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance