STORYMIRROR

Chandrashekhar Gaikwad

Romance

4  

Chandrashekhar Gaikwad

Romance

प्रीत जुळली जन्मोजन्मी

प्रीत जुळली जन्मोजन्मी

1 min
14.6K




हातामधल्या बशीमधले

कांदा पोहे चाखत होतो

चोरून तिला पाहता पाहता

उरात उसासे टाकत होतो


प्रेम पहीले पहील्या भेटीत

पहील्या नजरेत जुळले होते

साता जन्माची साथ असे ही

आधीच काळजास कळले होते


बैठकीतल्या वाटाघाटी

सत्वपरीक्षा घेऊन गेल्या

सरते शेवटी फुटून सुपार्या

दिलास दिलासा देऊन गेल्या


ब्रह्मचर्य मग बोहल्यावरती

पाऊल पडता संपून गेले

स न ई सोबत मंगलाष्टक

नाते नवे गुंफून गेले


करू सुखाचा संसार अवघा

वचन उभयता पाळतो आहे

पिकल्या केसात मोगरा गजरा

ह्याच हातानी माळतो आहे


Rate this content
Log in

More marathi poem from Chandrashekhar Gaikwad

Similar marathi poem from Romance